आम्ही लहान असतांना या फुलांशी खुप खेळायचो. कोणीतरी आम्हाला शिकवले होते. अशी दहा फुले,त्याच्या मोठ्या देठा सकट तोडायचो. मग ती फुले आम्ही रावणाच्या दहा तोंडांसारखी हातात धरायचो आणी टिचकी मारुन ती उडवायचो,एकदा उजवीकडचे, एकदा डावीकडचे, असे उडवायचो. शेवटचे मधले फुल उडवले की रावणाचे शेवटचे डोके उडवले आणी रावण मेला म्हणुन गलका करायचो. असे कितीतरी वेळा केल्याचे आठवते.
या बिनवासाच्या,गरिब फुलाचे सौंदर्य, कॅमेरा हातात आल्यावर उमगले.
Great Site...Love to see this kind work.. If you are travel bird then only you can do work like this.
ReplyDelete